शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अर्थकल्लोळ...

By admin | Updated: November 9, 2016 23:21 IST

अर्थचक्र विस्कळीत एटीएम, बँका बंद

 सांगली : केंद्र सरकारने मंगळवारी रात्री जाहीर केलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दच्या निर्णयानंतर जिल्ह्याचे अर्थचक्रच बुधवारी विस्कळीत झाले. जिल्ह्यातील सर्व बॅँका व एटीएम बंद असल्याने ग्राहकांच्या अस्वस्थतेत भर पडली. पेट्रोल पंपावरील ५०० रुपयांच्या पेट्रोल खरेदीच्या सक्तीचा मन:स्तापही ग्राहकांना सहन करावा लागला. बुधवारी जिल्ह्यातील ४७५ बॅँकांसह मार्केट कमिटी, सराफ बाजारपेठ आदींसह जिल्ह्यातील एक हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. पेट्रोलपंप : कर्मचाऱ्यांची मनमानी या निर्णयामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या ग्राहकांना बुधवारी दिवसभर पेट्रोल पंपांवर मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. सरकारने पेट्रोल पंपांवर पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे सांगितले असतानाही, शहरातील अनेक पंपांवर थेट पाचशे किंवा हजार रुपयांचेच पेट्रोल विकले जात होते. त्यापेक्षा कमी पेट्रोल हवे असल्यास सुटे पैसे आणा, अशी सक्ती केली जात होती. तरीही हुज्जत घालणाऱ्या ग्राहकास सरळ पेट्रोल संपल्याचे सांगितले जात होते. किरकोळ भाजी : विक्रेत्यांची पंचाईत दररोज किरकोळ भाजी विकून चरितार्थ चालविणाऱ्या भाजी विक्रेत्यांची मात्र, बुधवारी दिवसभर पंचाईत झाली. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या शहरातील शिवाजी मंडई, जुनी भाजी मंडई, मारूती चौक परिसरातील भाजी विकेत्यांना दिवसभर अडचणींना सामोरे जावे लागले. दररोज भाजी खरेदी करताना सुटे पैसे देणारे ग्राहक आज मात्र, ‘पाचशेची नोट घेणार काय?’ अशी विचारणा करत होते. या भाजी विक्रेत्यांना केवळ पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्या, एवढीच माहिती असल्याने विक्रेतेही ग्राहकाला माहिती देत, ‘आम्ही घेऊन काय करायचे?’ असा सवाल करत होते. अनेक ग्राहक, ‘दोनशे रूपयांची भाजी घेतो, मात्र पाचशेची नोट देणार,’ अशी आडमुठी भूमिका घेत होते. घाऊक व्यापाऱ्यांनी हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारल्या नाहीत. महापालिकेची करवसुली ठप्प सांगली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बुधवारी नागरिकांनी सकाळपासूनच महापालिकेत कर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पण प्रशासनाने मोठ्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिक कर न भरताच परतले. दिवसभरात घरपट्टी, पाणीपट्टीपोटी प्रत्येकी केवळ दोन लाखाचीच वसुली होऊ शकली. मिरज विभागीय कार्यालयात तर, नागरिकांना नोटा स्वीकारणार नसल्याचे लेखी लिहून देण्याची वेळ प्रशासनावर आली. महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून दररोज १४ ते १५ लाखाची वसुली होत आहे. बुधवारी दिवसभरात केवळ दोन लाखाची वसुली झाली. तीही मिरज कार्यालयात. सांगलीच्या कार्यालयात एक रुपयाही कर जमा झाला नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचीही अवस्था अशीच होती. पाणीपट्टीपोटी सोमवारी २४ लाख, तर मंगळवारी १७ लाखाची वसुली झाली होती. बुधवारी केवळ दीड लाख रुपये वसूल झाले. एलबीटी विभागाकडे तर एक रुपयाचाही भरणा होऊ शकला नाही. हॉटेलमध्ये पहिली विचारणा... ‘सुटे आहेत ना..?’ हॉटेलमध्ये चहापान, अल्पोपहारासाठी गेल्यानंतर नेहमी पहिल्यांदा पाणी देऊन आॅर्डर घेतली जाते. मात्र, बुधवारी हॉटेलमधील वेटर, ‘सर, सुटे पैसे आहेत ना?, पाचशेची नोट घेतली जाणार नाही,’ अशी विनंतीवजा सूचना देत होते. शहरातील काही मोठ्या आणि नामवंत हॉटेलमध्ये मेनू कार्डच्या पहिल्या पानावरच ‘पाचशे व एक हजार रूपयांची नोट स्वीकारण्यात येणार नाही’ असा कागद चिकटविण्यात आला होता. त्यातूनही काही हॉटेलमध्ये बिल देताना ग्राहकांनी पाचशे अथवा हजाराची नोट काढली, तर वादावादी होत होती. जिल्हा बँकेची तयारी पूर्ण सांगली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन करीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गुरुवारपासूनच्या नव्या आर्थिक व्यवहाराची सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभर बँकेच्या शाखांमधून चांगली सेवा देण्याचे आश्वासन बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ते म्हणाले की, गुरुवारपासून बँकेचे कामकाज पूर्ववत होईल. गुरुवारी सायंकाळपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या व्यवहाराबद्दलची सर्व माहिती रिझर्व्ह बँकेला कळविण्याचे आदेश आले आहेत. त्याप्रमाणे यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लोकांनी गोंधळून न जाता शिस्तबद्धरित्या व्यवहार करावेत. शासनाचा हा निर्णय चांगला आहे, त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)