Sangli: वारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:47 IST2024-05-29T12:43:03+5:302024-05-29T12:47:39+5:30

वारणावती : वारणावती (ता.शिराळा) परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा अतिसौम्य ...

Earthquake in Warana Dam area Sangli | Sangli: वारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का

Sangli: वारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का

वारणावती : वारणावती (ता.शिराळा) परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा अतिसौम्य भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती वारणा सिंचन विभागाने दिली.

हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे.

Web Title: Earthquake in Warana Dam area Sangli