शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

तासगाव पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना दुष्काळाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:22 IST

तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतासगाव पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना दुष्काळाचा विसरपाच गावांची पाहणी करून केवळ औपचारिकता पूर्ण

दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे.तासगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सर्वांना संधी या न्यायाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभापती आणि उपसभापती पदाची संगीत खुर्ची केली आहे. पदाधिकारी खुर्चीवर बसून अनुभव येईपर्यंत पायउतार होतात. परिणामी प्रशासनाचा अभ्यास आणि अनुभव नसल्याने भोंगळ कारभाराचे चित्र चव्हाट्यावर आले आहे.तालुक्यात दुष्काळाची मोठी भीषण परिस्थिती आहे. तासगाव पूर्व भाग होरपळून निघत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची फरफट सुरु आहे. टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असला तरी हे पाणी पुरेसे नाही. जनावरांनादेखील पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जनावरांना चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अद्याप डोंगरसोनी वगळता एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु झालेली नाही. पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना मात्र दुष्काळाचा विसर पडला आहे. पद मिळावे, यासाठी नेत्यांकडे सातत्याने अट्टाहास करणारे पदाधिकारी, पद मिळाल्यानंतर मात्र खुर्चीभोवतीच घुटमळत आहेत. दुष्काळाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यापेक्षा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि कामांतच त्यांना जास्त इंटरेस्ट असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सोशल मीडियावर सत्ताधारी भाजपविरोधात टाहो फोडत असताना, पंचायत समितीत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांविरूध्द मात्र शब्द काढत नाहीत.

सभापतींनी केवळ पाच गावांची पाहणी करून केवळ औपचारिकता पूर्ण केली. या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा होताना दिसून येत नाही.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगलीpanchayat samitiपंचायत समिती