धक्कादायक! दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळला, सहा वर्षाच्या चिमुरड्यामुळे घटना उघडकीस आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 23:03 IST2025-03-27T23:02:33+5:302025-03-27T23:03:34+5:30

 याबाबत घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली   माहिती अशी,  संशयीत आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे हा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत.

Drunk wife strangled, incident revealed due to six-year-old child | धक्कादायक! दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळला, सहा वर्षाच्या चिमुरड्यामुळे घटना उघडकीस आली

धक्कादायक! दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळला, सहा वर्षाच्या चिमुरड्यामुळे घटना उघडकीस आली

मांगले  - येथील वारणा रस्त्यावरील भाड्याने राहत असलेल्या घरात पती - पत्नीच्या वादात पतीने दारुच्या नशेत पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करून मृतदेह विद्युत पंपाच्या लहान पेटीत कोबून ठेवल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.  प्राजक्ता मंगेश कांबळे (वय. २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून  मंगेश चंद्रकांत कांबळे ( मुळगाव कोकरूड, सध्या रा. मांगले ) असे संशयित आरोपी पतीचे नाव असून तो स्वता : दुपारी पोलीस ठाण्यात हजर होवून घटनाक्रम सांगितला.

 याबाबत घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली   माहिती अशी,  संशयीत आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे हा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले -  वारणानगर रस्त्यावर जोतीबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू  घरात ते भाड्याने राहत आहेत.  मंगेश हा काही वर्षापासून पत्नी- मुलासह सह मुंबई येथे खाजगी काम करत असून गेल्या चार दिवसापूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम  तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे रहायला आले होते.

आज सकाळी साडेनऊ च्या सुमारास  निलेश आणि त्याची आई देववाडी येथे एका दुखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते . घरी  मंगेश आणि प्राजक्ता व दोन्ही मुले होती. सकाळी दहाच्या दरम्यान निलेश व प्राजक्तामध्ये जोरदार वाद झाला.  हा वाद विकोपाला जाऊन  दारूच्या नशेत मंगेशने प्राजक्ताचा ओढणी चे दोन तिडे टाकून गळा आवळून खून केला.  खून करून मृतदेह  बाजूच्याच खोलीत नेहला व त्याठिकाणी घर मालकाने ठेवलेल्या मोकळ्या आडीच फूट बाय आडीच चा विद्युत पंपाच्या ठेवला. बसत नाही म्हटल्यावर हात पाय मोडून मोडून मृतदेह कोबला व पेटीचे दार झाकूले . त्यापुढे बॅग ठेवली व पेटीवर अंथरूण ठेवले. खोलीला बाहेरून कुलूप घालून पसार होण्याचा प्रयत्नात होता.

यावेळी त्याची गाडी  भाऊ निलेश घेवून गेला होता, त्याला  फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये असा निरोप दिला. त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. ह्याच दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले. त्यावेळी  सहा वर्षाच्या शिवमने  मम्मी ,पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले . त्यानंतर निलेशने त्वरीत मंगेश ला फोन करून कुठे आहेस असे विचारले,त्यावेळी  त्याने मी शिराळा येथील  गोरक्षनाथ मंदिरा जवळ असून प्राजक्ता भांडून गेली आहे. तिला शोधत असल्याचे सांगितले . त्यावर तू तिथेच थांब आम्ही आलो असे सांगीतले. त्यानंतर निलेशने देववाडी येथील येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले.

मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो म्हणून सांगितले. त्यानंतर  गोरक्षनाथ मंदिराजवळ जावून  सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्यांने खून  केल्याचे  सांगितले . त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले. त्यानंतर मंगेश स्वतः शिराळा  पोलिसात हजर झाला. व घटनाक्रम सांगितला.  

 दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यावर ज्योतिबा मंदिरा शेजारी वाघ यांच्या घरासमोर पोलीस आल्या नंतर शेजारच्या  लोकांना याची माहिनी मिळाली. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

 शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. व नातेवाईका व पंचासमक्ष पेटी उघडून मृतदेह बाहेर काढला रितसर पंचनामा करून पोलीसांनी  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात न्हेण्यात  आला .अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत .

शिवममुळे घटना उघडकीस

ही घटना सकाळी दहाच्या सुमारास  सहा वर्षाचा शिवम व तीन वर्षाची शिवन्या यांच्यासमोर घडली. त्याने चुलता निलेशला सांगितल्याने ही घटना  उघडकीस आली. अन्यथा दुर्गधी सुटल्यानंतर समजले असते . सकाळची घटना दुपारी दोन वाजता उघडकीस आली, यामुळे येथे खळबळ उडाली.

Web Title: Drunk wife strangled, incident revealed due to six-year-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.