शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

"गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगेंच्या आरेवाडीतील मेळाव्यास परवानगी देवू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:57 IST

ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्याला परवानगी नाकारावी असा ठराव केला

ढालगाव : आरेवाडी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या बनात दसऱ्याच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केले आहे. या दोन्ही मेळाव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्याला परवानगी नाकारावी, असा ठराव केला आहे. तसेच पोलीस उपअधीक्षकांनाही परवानगी न देण्याबाबत विनंती केली आहे.बिरोबा बनातील भक्त निवास येथे पत्रकार बैठक घेऊन ही माहिती देण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरू कोळेकर आदींसह विश्वस्त उपस्थित होते.आरेवाडी येथील बिरोबा बनात २ रोजी दसरा मेळावा घेण्यासाठी रावसाहेब कोळेकर यांनी २२ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. सरपंच व ग्रामसेवकांनी मेळाव्यास परवानगी दिली होती. त्यानंतर २५ रोजी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही त्याच दिवशी दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागितली. एकाच दिवशी, एकाच वेळी दोन्ही पक्षांनी परवानगी मागितल्याने ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने बहुमताने ठराव घेऊन दोघांनाही मेळाव्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरPrakash Shendgeप्रकाश शेंडगे