सांगलीत महावितरणच्या बिल छपाईस घरगुती कनेक्शनचा वापर, तक्रारीनंतर रोखला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:00 IST2025-02-17T16:59:46+5:302025-02-17T17:00:09+5:30
सांगली : येथील गव्हर्नमेंट कॉलनीत बिलांच्या छपाईचा ठेका मिळालेल्या एजन्सीमार्फत घरगुती विद्युत कनेक्शनवर छपाई केली जात होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर ...

सांगलीत महावितरणच्या बिल छपाईस घरगुती कनेक्शनचा वापर, तक्रारीनंतर रोखला प्रकार
सांगली : येथील गव्हर्नमेंट कॉलनीत बिलांच्या छपाईचा ठेका मिळालेल्या एजन्सीमार्फत घरगुती विद्युत कनेक्शनवर छपाई केली जात होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरण अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करून व्यावसायिक वीज वापर करण्याच्या सूचना दिल्या. दंडात्मक कारवाईबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
सांगलीच्या गव्हर्नमेंट कॉलनीत एका अपार्टमेंटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या बिलांची छपाई केली जात आहे. बिलांचे बॉक्स याठिकाणचीच ठेवून ते गरजेनुसार वितरणास पाठविले जात होते. महावितरणकडून छपाईचा ठेका मिळाल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये त्यांनी छपाई सुरू केली. मात्र, घरगुती वीज कनेक्शन घेऊन त्याद्वारे त्यांचा व्यवसाय सुरू होता.
याबाबत येथील नागरिकांनी महावितरणच्या विश्रामबाग कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर महावितरणच्या एक महिला अधिकारी व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून विद्युत कनेक्शनची चौकशी केली. घरगुती वीज कनेक्शन घेत व्यावसायिक वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी छपाई बंद करून संबंधित मालकास महावितरण कार्यालयात येऊन भेटण्याची सूचना दिली. संबंधित एजन्सीचालकास दंड लावण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.