शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रताळी, गाजरे कोठे लागतात, माहीत आहे का?

By admin | Updated: September 1, 2015 22:14 IST

जयंत पाटील : मिरजेतील मेळाव्यात शासनावर टीका; दुष्काळप्रश्नी आंदोलन उभारण्याचा इशारा

मिरज : रताळी व गाजरे कोठे लागतात, याची माहिती आताच्या राज्यकर्त्यांना नाही. कुंभमेळ्यात गुंतलेल्या या राज्यकर्त्यांना दुष्काळाबाबत गांभीर्य नाही, अशी टीका मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, चारा छावण्या व चारा डेपो सुरू करा, म्हैसाळ योजनेचे २२ कोटी पाणीपट्टी व साडेचार कोटी वीजबिल माफ करा, अशा मागण्या आ. पाटील यांनी केल्या.परतीचा पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यात भयानक अवस्था होणार आहे. दुष्काळाबाबत संवेदनशील नसलेल्या शासनाविरुध्द राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, युती शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. कांद्याचा वाढलेला भाव शेतकऱ्यांना न मिळता परदेशातून आयात केलेल्या कांद्यालाच मिळाला आहे. शेतीमालाचे दर वाढले म्हणजे महागाई वाढली, असा अपप्रचार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाचा उत्पादन खर्च मिळाला पाहिजे. ऊस पिकावर बंदी घालण्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. साखर निर्यातीवर बंदी आणि उसाला व साखरेला दर नसल्याने कारखाने शेकडो कोटीच्या तोट्यात आहेत. शासनाच्या या धोरणामुळे सहकारी कारखाने टिकणे अवघड आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनाएफआरपी देणेही कारखान्यांना शक्य नाही. रताळी व गाजरे कोठे लागतात याचीही राज्यकर्त्यांना माहिती नाही. पंतप्रधान मोदी लोकसभेत कमी आणि परदेशातच जास्त दिसतात. देशातील नागरिकांऐवजी परदेशातील भारतीयांच्या हिताची त्यांना जास्त काळजी आहे.युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, आप्पासाहेब हुळ्ळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, सदानंद कबाडगे, भारत कुंडले, गंगाधर तोडकर, साहेबराव जगताप उपस्थित होते. (वार्ताहर) दोन वर्षात विधानसभेच्या निवडणुकाभाजप व शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद आहेत. शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याने, दोन वर्षात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे. बाजार समितीत आमचा निसटता पराभव झाला आहे. मात्र जिल्हा परिषद, जिल्हा बँक आपल्याकडे आहे. मिरज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश मिळविल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.