शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

जिल्हा बँकेचे नुकसान, सुनावणी लांबणीवर

By admin | Published: February 13, 2015 10:32 PM

संस्थांचे कर्ज वाटप : १०२ जणांना नोटीस

सांगली : जिल्हा बँकेला १५७ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी मुदतवाढ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. याबाबतची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आज (शुक्रवार) प्रशासकांकडून देण्यात आली. नियमबाह्य, विनातारण व मर्यादा ओलांडून २१ संस्थांना कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी माजी संचालक व अधिकाऱ्यांसह १०२ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चौकशी अधिकारी म्हणून कऱ्हाडचे उपनिबंधक संपतराव गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारमंत्र्यांनी अपील फेटाळल्याने ही चौकशी सुरू आहे. आज माजी संचालक मदन पाटील, दिलीप वग्याणी, डॉ. सिकंदर जमादार यांच्यासह नऊ जणांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. ती मान्य करून आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणीची तारीख सोयीने जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)