शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: उसाच्या वाड्यावरुन वाद, ढाणेवाडीत तरुण शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:43 IST

शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे. उसाच्या वाड्याच्या किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीनंतर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, हा मृत्यू मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणांनी, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया व तपास सुरू होता. विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५, रा. ढाणेवाडी, ता. कडेगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. २९ ) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ढाणेवाडी येथे विनायक यांच्या चुलत्याच्या उसाच्या शेतात काही तरुणांशी उसाचे वाडे देण्यावरून विनायक यांचा वाद झाला होता. या वादानंतर संबंधित तरुणांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येते. मारहाणीनंतर विनायक ढाणे यांची प्रकृती अचानक खालावली. ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कडेगाव येथील रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारहाणीचा शरीरावर झालेला परिणाम कारणीभूत ठरला की, अन्य कोणते कारण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या घटनेनंतर ढाणेवाडी गावात तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.पोलिस ठाण्यासमोर ग्रामस्थांचा ठिय्याढाणेवाडी ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्याच्या व खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कडेगाव पोलिस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या मारला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Young farmer dies after sugarcane field dispute, assault.

Web Summary : A young farmer from Dhanevadi, Kadegaon, Sangli, died after a dispute over sugarcane. He was allegedly beaten, but the exact cause of death is under investigation. Villagers demand murder charges and protested at the police station.