रोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:26 PM2019-12-09T14:26:37+5:302019-12-09T14:27:32+5:30

बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.

Diseases ruin vineyards, drugs vanish | रोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामी

रोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामी

Next
ठळक मुद्देरोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामीबोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ

दत्ता पाटील 

तासगाव : बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.

तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्ट्रीय  औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते. यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे.

द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे. पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.

तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

Web Title: Diseases ruin vineyards, drugs vanish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.