शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पडळकरांचे भाकित अन् इस्लामपुरात संशयकल्लोळ, जयंत पाटलांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 13:18 IST

जयंत पाटलांना डिवचण्यासाठी भाजपची पडळकरांच्या खांद्यावर बंदुक

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. तीन दिवसांपूर्वी पडळकर यांनी भविष्यात जयंत पाटील यांच्या निवासस्थानावरही भाजपचा झेंडा दिसेल, असे भाकीत केल्यानंतर वाळवा-शिराळ्यात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.उमदी (ता. जत) येथील कार्यक्रमात आ. पडळकर यांनी जयंत पाटील हेसुद्धा आगामी काळात भाजपमध्ये दिसतील, असे भाकीत केले. राज्यात सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील यांचे नाव निश्चित असल्याचे वाळवा, शिराळ्यात बोलले जात होते. परंतु त्या पदावर अजित पवार यांची निवड झाल्यानंतर पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यानंतर राष्ट्रवादीने पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड केली.राज्यातील सत्ताबदलानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे, तर राज्य पातळीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून उलट-सुलट वक्तव्ये येत आहेत. त्यातच आ. पडळकर यांनी जयंत पाटील आगामी काळात भाजपमध्ये दिसतील, असे भाकीत करत खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर पाटील काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवत आहेत.भाजपची पडळकरांच्या खांद्यावर बंदुकवाळवा, शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना डिवचण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे दिसत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकर