शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेच्या थकबाकीवरून मतभेद

By admin | Updated: October 3, 2015 23:48 IST

संतप्त प्रतिक्रिया : शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर बोजा चढविण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध

सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, तासगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या थकबाकीच्या मुद्द्यावरून लाभक्षेत्रातील शेतकरी व लोकप्रतिनिधींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात कृष्णा खोरे प्रशासनाने आवर्तनाची थकबाकी थेट शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढवण्याची प्रक्रिया चालू केल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, शेतकऱ्यांनी फुकटच्या पाण्याचा सोस सोडला तरच योजना पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचे सांगितले, तर शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला मात्र कडाकडून विरोध दर्शवला. प्रतिसादावर योजना अवलंबून... याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या माध्यमातून चार तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होत असताना योजना चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद मात्र अत्यल्प आहे. आवर्तन सुरू करण्याच्या अगोदर प्रशासनाच्यवतीने जाहीर प्रकटने, गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्याकडून मागणी अर्ज भरून घेतले जातात. या प्रक्रियेसही शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळतो आहे. आजअखेर टंचाई निधीतून ३६ कोटी रुपयांची थकबाकी अदा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून मात्र वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दर बघितला तर पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना म्हैसाळ योजनेतील १० हजार लिटर पाण्याला १३ रुपये दर आकारण्यात येतो. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातील केवळ ५ टक्के रक्कम अदा केल्यास योजना चालवण्यास अडचण येणार नाही. वसुलीला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच योजना अवलंबून आहे.