शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खटावला दूषित पाण्याने शंभरजणांना अतिसार

By admin | Updated: December 23, 2015 01:22 IST

तलावातील पाण्याचा परिणाम : शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा

मिरज : तालुक्यातील खटाव येथे यल्लम्मादेवीच्या यात्रेदरम्यान तलावातील दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुमारे शंभरजणांना अतिसाराची लागण झाल्याची घटना घडली. ताप, जुलाब, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर मिरज तालुक्यातील खटाव, आरग, अथणी तालुक्यातील मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. खटाव येथे तीन दिवसांपूर्वी यल्लम्मादेवीची यात्रा पार पडली. यात्रेसाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. यात्रेदरम्यान गावात लिंगनूर हद्दीत विहिरीतून नळपाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र यात्रेदरम्यान गावात आलेल्या जादा लोकांसाठी विहिरीशेजारी असलेल्या तलावातून पाणी विहिरीत सोडण्यात आले. तलावातील दूषित पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा करण्यात आल्याने गावातील शेकडोजणांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. डोकेदुखी, ताप, जुलाब, उलट्या या लक्षणांमुळे खटावसह आरग, मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. गावातील सचिन जताण्णावर, शैलेश जताण्णावर, गणेश खटावकर, गोविंद चंदूरकर यांच्यासह अन्य रुग्णांवर उपचार करण्यात आले. अतिसाराच्या साथीमुळे तलावातील पाणीपुरवठा बंद करून पुन्हा विहिरीतून शुध्दीकरण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस गावात सुरू असलेली अतिसाराची साथ नियंत्रणात आहे. मात्र पंचायत समिती आरोग्य विभागाचे अधिकारी खटावकडे फिरकले नसल्याचे सांगण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, या अतिसाराच्या साथीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. आरग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. धेंडे यांनी गावातील पाण्याचे नमुने तपासणी व रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)दुष्काळामुळे पातळी कमी : विहिरीतून पुरवठाकर्नाटक सीमेवर असलेल्या खटाव गावाला लिंगनूर हद्दीतील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. अवर्षणामुळे विहिरीशेजारी असलेल्या तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. पाण्याने तळ गाठला असल्याने शिल्लक असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा होती. खटावचे उपसरपंच रावसाहेब बेडगे यांनी मात्र गावात दूषित पाणीपुरवठा झाला नाही व आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अतिसाराचे रुग्ण आढळले नसल्याचे सांगितले.