शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis : 'घरांची पडझड, शेती-पिकांचं नुकसान, 70 एकर जागेत पुनर्वसनाची मागणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:34 IST

Devendra Fadanvis : मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देसांगलीच्या वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घराची पडझड झाली आहे.

सातारा - भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. बुधवारी त्यांनी पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील गावऱ्यांची भेट घेतली. 23 जुलै रोजी आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील नागरिकांची शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी गावकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जेवणही केलं. त्यानंतरस आज सांगली जिल्ह्यातील वाळवा गावाला भेट दिली. 

मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, साताऱ्यातील आंबेघरमध्येही दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झालाय. सांगलीमध्येही पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहेत, घरांची पडझड झाली आहे. शेतीचं आणि शेती पिकांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे, फडणवीस यांनी आज सांगलीतील वाळवा गावाला भेट दिली.  सांगलीच्या वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घराची पडझड झाली आहे. शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान आहे. मनुष्यहानी टळली, हेच सुदैव. ७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे, अशा स्थानिकांच्या मागण्या असल्याचे फडणवीस यांनी ट्विटरवरुन सांगितले. तसेच, आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले. दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. संजय पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख हेही यावेळी दौऱ्यात सहभागी होते.

वाढीव मदत मिळणं गरजेचं

दरडग्रस्तांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'नुकसान खूप मोठं आहे. या सर्व दरडग्रस्तांच पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल', असे मत त्यांनी साताऱ्यात व्यक्तं केलं होतं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीSangli Floodसांगली पूर