शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोविड रुग्णालयातील दररोजचा कचरा १७० किलोचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 7:04 PM

जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. दररोज सरासरी १७० किलो कचरा कोरोनाशी संबंधित उपचार केंद्र, क्वारंटाईन कक्ष, प्रयोगशाळेतून गोळा होत आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया केंद्रात ८५० अंश तापमानात होतो नष्ट--संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा

अविनाश कोळी-सांगली : मिरजेतील कोविड रुग्णालय आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून दररोज १७० किलो जैव वैद्यकीय कचरा तयार होत असून, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या कचºयाचे संकलन, वाहतूक व नष्ट करण्यासाठी तयार केलेले प्रक्रिया केंद्र यापर्यंतचा प्रवास अत्यंत सुरक्षित साधनांद्वारे केला जात आहे.मिरजेतील कोविड रुग्णालयात सध्या २० रुग्ण असून, विविध ठिकाणच्या संस्थात्मक अलगीकरण कक्षात १७७ रुग्ण आहेत. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचा-यांची संख्याही अधिक आहे. प्रयोगशाळेतील यंत्रणा वेगळी आहे.

उपचारासाठी, तपासण्यांसाठी अनेक वैद्यकीय साधनांचा वापर होतो. मास्क, ग्लोव्हज, सिरिंज, औषधांच्या बॉटल्स व अन्य बरेचसे साहित्य दररोज टाकून द्यावे लागते. त्यामुळे दररोजचा कचरा तात्काळ नष्टही करावा लागतो. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोविड रुग्णालय, प्रयोगशाळा, संस्थात्मक अलगीकरण कक्षातील टाकून द्याव्या लागणा-या जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. दररोज सरासरी १७० किलो कचरा कोरोनाशी संबंधित उपचार केंद्र, क्वारंटाईन कक्ष, प्रयोगशाळेतून गोळा होत आहे.असा नष्ट केला जातो कचरारुग्णालय, प्रयोगशाळा व अलगीकरण कक्षातील कर्मचारी तेथील कचरा एक टक्का हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करून घेतात.एका बॉक्समध्ये हा कचरा बंदिस्त केला जातो. त्या बॉक्सवर पुन्हा हायपोक्लोराईड फवारणी होते.बॉक्सवर वेगळा बारकोड टाकला जातो.नियुक्त खासगी संस्थेचे वाहन येऊन बारकोड स्कॅन करते आणि कचरा वाहनात घेतला जातो. कुपवाड एमआयडीसीमधील प्रक्रिया केंद्रावर तो उतरविला जातो यंत्रात ८५० अंश तापमानात इन्सिनरेशन प्रक्रिया (जाळणे) करून तो नष्ट होतो.कर्मचा-यांची काळजीकचरा संकलन करणाºया संस्थेचा कर्मचारी फेस शिल्ड, ग्लोव्हज वापरतो. प्रक्रिया केंद्रावर तो कचरा नष्ट झाल्यानंतर त्याचा गणवेश निर्जंतुकीकरण करून आंघोळ करून तो दुसरे कपडे घालून निघून जातो. कोविड रुग्णालयातील कचºयासाठी व क्वारंटाईन केंद्रासाठी स्वतंत्र वाहने आहेत.

 

अत्यंत सुरक्षा बाळगून कचरा वेगळा

जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी सांगितले की, अत्यंत सुरक्षा बाळगून कोविड रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील कचरा वेगळा करून तो बंदिस्त व निर्जंतुकीकरण केला जातो. नागरिकांनी, औषध दुकानदारांनी किंवा जे लोक दररोज वापरून टाकावे लागणारे ग्लोव्हज, मास्कचे निर्जंतुकीकरण करून ते बंदिस्त करून कचरा गाडीत वर्गीकृत डब्यात टाकावे. सार्वजनिक ठिकाणी ते टाकणे किंवा जाळणे योग्य नाही.नियमांचे पालन केले जातेसूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटीच्या संचालिका मेघना कोरे यांनी सांगितले की, दररोजचे कचरा संकलन करताना सतर्कता, सुरक्षितता आम्ही बाळगतो. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे पालन केले जात आहे. दररोजच्या कचरा संकलनाची व त्याची विल्हेवाट लावल्याची माहितीही कार्यालयाला द्यावी लागते. कर्मचाºयांच्या सुरक्षिततेची सर्वाधिक काळजी घेतली जात आहे

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलSangliसांगली