शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे!

By admin | Updated: July 25, 2014 23:33 IST

अनिल बाबर : उमेदवारीला राजेंद्रअण्णांचाच नकार

विटा : खानापूर विधानसभेची उमेदवारी आटपाडीला देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच सांगितले होते. त्यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशीही मी उमेदवारीबाबत चर्चा केली होती. चर्चेवेळी त्यांना खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने जनसंपर्क ठेवावा लागेल, असे सुचविले होते. त्यासाठी मीसुध्दा वर्षभर प्रयत्नशील होतो. त्यावेळी राजेंद्रअण्णांनी स्वत:च उमेदवारीस स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आता अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले आणि आम्ही अचानक कसे शत्रू झालो, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पक्षश्रेष्ठींसमोर झालेली चर्चा व आटपाडीकरांनी मला केलेली मदत लक्षात घेता, मीही त्यांना अन्य पदांवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता माझे काय चुकले, हे देशमुख यांनीच सांगावे, असा सवाल माजी आमदार अनिल बाबर यांनी आज (शुक्रवारी) गार्डी (ता. खानापूर) येथे पत्रकार परिषदेत केला.बाबर म्हणाले की, मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजअखेर पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत व्यक्तिगत नुकसान होणार असल्याची माहिती असूनही, पक्षादेश मानून मी आघाडी धर्माचे पालन केले. पक्षनेतृत्वाचा आदेश शिरोधार्ह मानून पक्षशिस्त पाळली. येणारी विधानसभा निवडणूक व राहिलेल्या कालावधीचा विचार करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील व जयंत पाटील यांच्याशी मी उमेदवारीबद्दल चर्चा केली होती. त्या चर्चेत आटपाडीला आपण उमेदवारी देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी सांगितले होते. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांनी खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशी आग्रही मागणीही मी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.आटपाडीतील नेतृत्वाने मला व पक्षाला केलेली मदत लक्षात घेऊन, आमदारकीपेक्षा ज्या पदाला महत्त्व आहे, त्या व अन्य पदांवर आटपाडीला संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले आहेत. विधानसभा उमेदवारीसंदर्भात मी राजेंद्र्रअण्णांशी चर्चा केली होती. त्यावेळी देशमुख यांनी विधानसभेची उमेदवारी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. उमेदवारीबाबत मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसमोर झालेल्या बैठकीत सर्व चर्चा स्पष्टपणाने झाल्या आहेत. याचा तपशीलही मी देण्यास तयार आहे. मात्र, असे असताना अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले, आम्ही अचानक शत्रू कसे झालो, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही बाबर यावेळी म्हणाले. मी कुणाचाही शत्रू नाही, कुणालाही शत्रू मानत नाही व भविष्यातही मानणार नाही, पण देशमुख यांचे वक्तव्य जनतेत गैरसमज पसरविणारे आहे. सर्व चर्चा झाली असतानाही व उमेदवारीला राजेंद्रअण्णांनी स्पष्ट नकार दिला असतानाही त्यांनी असे वक्तव्य केल्याने, माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे, असा प्रतिसवाल बाबर यांनी केला. (वार्ताहर)विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रामराम ठोकून बाबर शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा खानापूर मतदारसंघात सुरू आहे. त्याबाबत बाबर यांना विचारले असता त्यांनी, थांबा व पहा, एवढेच सांगून या प्रश्नाला बगल दिली.