शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराडमध्ये उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू, वाहतूक कोलमडली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 12:47 IST

ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या वाहनधारकांचे उकाड्याने प्रचंड हाल झाले.

मानाजी धुमाळ रेठरे धरण : पुणे-बेंगळुरु या आशियाई  राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे पुण्याकडून कोल्हापुरकडे जाणारी वाहतूक आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोलमडली. सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मेगा ब्लॉक झाला आहे. दररोजच वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक प्रचंड संतापले आहेत.ट्राफिक जाम व उन्हाच्या प्रचंड झळा बसून वाहन चालक कासावीस झाले आहेत. पुणे कडून बेंगळुरुच्या दिशेने जाणारी वाहने कृष्णा हॉस्पिटल उड्डाण पुलावरुन जात होती. परंतू हा पूल पाडण्याचे कामास सुरुवात कली असून, कृष्णा हॉस्पिटल समोर पूर्वेला असणाऱ्या कोल्हापूर कडे जाणाऱ्या चिंचोळ्या उपमार्गावरून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणाहून सिंगल वाहने जात असल्याने छोट्या कार तसेच अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या वाहनधारकांचे उकाड्याने प्रचंड हाल झाले.वोटन पुलाच्या पाठीमागे दुचाकी, एसटी बसेस, कार, ट्रक, कंटेंनर, महामार्गाच्या कामामुळे महामार्गावर अडकून पडले आहेत. येथील नवीन उड्डाण पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे.महामार्गावरील दहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली आहे. यामुळे उपमार्गासह महामार्गावर सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. याचा महामार्गावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना व स्थानिकांना चांगलाच फटका बसला. पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कार कराड शहरात जाणाऱ्या जुन्या कोयना पुलावरून कराड मार्गे कार्वेनाका ते बैल बाजार ते मलकापूर या मार्गावरून कोल्हापुरच्या दिशेने जात आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKaradकराडTrafficवाहतूक कोंडी