शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गेल ऑम्वेट यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत मोठी पोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

सांगली : सामाजिक चळवळीच्या नेत्या, विदुषी डॉ. गेल ऑम्वेट यांनी महिला, दलित, भटक्या समाजाच्या हक्कांसाठी चळवळी उभ्या केल्या. महात्मा ...

सांगली : सामाजिक चळवळीच्या नेत्या, विदुषी डॉ. गेल ऑम्वेट यांनी महिला, दलित, भटक्या समाजाच्या हक्कांसाठी चळवळी उभ्या केल्या. महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांनी तो सामान्यांपर्यंत पोहोचविला. गेल यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कोट

डॉ. भारत पाटणकरांच्या पत्नी, विविध सामाजिक चळवळींच्या आघाडीच्या नेत्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनाने विविध चळवळींची, पाटणकर परिवाराची मोठी हानी झाली आहे. गेल मूळच्या अमेरिकन असल्या तरी त्यांनी भारतीय सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास केला होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.

-आनंदराव पाटील, पाणी चळवळीचे नेते, आटपाडी.

कोट

डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका पाटणकर यांचा स्त्री-चळवळीचा संघर्ष आदर्शवत आहे. पाश्चात्य स्त्रियांच्या बाबतीतील अनेक अफवा आपल्याकडे आहेत; परंतु पतिव्रतेप्रमाणे गेल आणि भारत पाटणकर यांनी संसार केला आहे. गेल यांच्या जाण्याने विशेषत: स्त्री-चळवळीत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आदिवासी स्त्रीपासून ते पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रीमजूर, दलित महिलांपर्यंत उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष उभा केला होता.

-डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत.

कोट

डॉ. गेल ऑम्वेट यांनी देशाच्या विविध विद्यापीठांतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये समाजशात्र सोप्या पद्धतीने मांडले होते. त्या चालतेबोलते विद्यापीठ होत्या. महिला, दलित, भटक्या समाजाच्या हक्कांसाठी त्या लढल्या आणि त्यांनी न्यायही मिळवून दिला. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- प्रा. सुषमा नायकवडी, माजी सभापती, जिल्हा परिषद, सांगली

कोट

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात शिक्षण घेऊन सामाजिक जातिव्यवस्थेच्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या. येथील प्रत्येक मागास घटकापर्यंत जाऊन त्यांच्यात जागृती करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढल्या. महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास करतानाच त्यांनी महाराष्ट्रातील थोर संतांचाही मोठा अभ्यास केला होता. त्यांची सर्व पुस्तके समाजाचा विकास करणारी अशीच आहेत.

- धनाजी गुरव, कार्याध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ.

कोट

पुढारलेल्या अमेरिका राष्ट्रात पीएच.डी. करूनही डाॅ. गेल ऑम्वेट यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारून देशातील विषमतेचा अभ्यास केला. महिलांना समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी मोठा लढा दिला होता.

-ॲड. के. डी. शिंदे, जिल्हाध्यक्ष, जनता दल