शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शेतकऱ्यांनी आवळली वज्रमूठ, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दिली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:19 IST

.. तर अधिकाऱ्यांचे हातपाय मोडू !

बुधगाव (जि.सांगली) : नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रविवारी कवलापूर (ता. मिरज) येथे शासनाच्या धोरणाचा निषेध करीत, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी दिली. बाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकवत, हे ध्वज काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही दिला.प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी शासनाचा आग्रह कायम असतानाच, बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाचा हा मनसुबा उधळण्यासाठी विरोधाची वज्रमूठ पुन्हा एकदा घट्ट आवळण्यास सुरुवात केली आहे. शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून रविवारी कवलापुरात शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

...अन्यथा गाठ आम्हा शेतकऱ्यांशीबाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकविले. ‘भगवा ध्वज हा छत्रपती शिवरायांचा ध्वज आहे. तोच भगवा आमचा प्राण आहे. तो आमच्या शेतातून काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अन्यथा गाठ आम्हा शेतकऱ्यांशी आहे’ असा निर्वाणीचा इशारा या माध्यमातून देण्यात आला. शेतकरी कुटुंबांच्या मुळावर उठलेल्या या शासनाने हा महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

.. तर अधिकाऱ्यांचे हातपाय मोडू !शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी बळजबरीने कोणी अधिकारी शेतात आलेच तर प्रसंगी त्यांचे हातपाय मोडू, असा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन