दहावी-बारावीची ऑनलाइन परीक्षा घेणे अर्थहीन ठरणार असल्याने दोन महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य नसेल तर ऑफलाइन परीक्षेत सवलत द्यावी. गतवर्षी दहावी भूगोल पेपर झाला नसतानाही इतिहासाप्रमाणे भूगोल विषयाचे गुण देण्यात आले. या वर्षी दहावीचे गुण देताना गणित व विज्ञान या दोन विषयांपैकी एका विषयाची परीक्षा घेऊन दुसऱ्या विषयास तेवढेच गुण द्यावे. मराठी इंग्रजी व समाजशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयाची परीक्षा घेऊन उर्वरित विषयांना तेवढेच गुण द्यावेत. बारावीला फिजिक्स केमिस्ट्री यापैकी एक विषय, बायोलॉजी गणित यापैकी एक विषय व वाणिज्य व कला शाखेत महत्त्वाचे दोन विषय घेऊन परीक्षा घेता येईल व उर्वरित विषयांना गुण द्यावे. दहावी-बारावी परीक्षा एप्रिलऐवजी जून किंवा जुलैमध्ये घ्याव्यात. सहा विषयांपैकी दोन किंवा तीन विषयांची परीक्षा घेतल्याने निकाल लवकर देणे शक्य होईल व कोविड संसर्गही टाळता येईल, असे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रविीद्र फडके यांनी निवेदनात म्हटले आहे.
दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST
दहावी-बारावीची ऑनलाइन परीक्षा घेणे अर्थहीन ठरणार असल्याने दोन महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य नसेल तर ऑफलाइन परीक्षेत ...
दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}