तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून २० लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 18:45 IST2022-01-19T18:44:44+5:302022-01-19T18:45:04+5:30

महिला साथीदारामार्फत कोळी याने पीडित तरुणीच्या नातेवाईकांवर खोटे खटले दाखल करण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे.

Demand for Rs 20 lakh for making a pornographic video of a young woman viral | तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून २० लाखांची मागणी

तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून २० लाखांची मागणी

मिरज : तरुणीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन तिला आपल्याकडे पाठवा आणि वीस लाख रुपये द्या, अशी मागणी करणाऱ्या बेडग (ता. मिरज) येथील तरुणासह साथीदार महिलेवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यल्लाप्पा ऊर्फ यलगोंडा चंद्रकांत कोळी असे त्याचे नाव आहे.

महिला साथीदारामार्फत कोळी याने पीडित तरुणीच्या नातेवाईकांवर खोटे खटले दाखल करण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल दिली आहे. बेडग येथील यल्लाप्पा कोळी याने एका महिलेशी असलेल्या संगनमताने पीडित तरुणीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिचे अश्लील व्हिडिओ बनविले.

तिची आक्षेपार्ह छायाचित्रेही काढली. तरुणीची छायाचित्रे व व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली व पीडित तरुणीच्या नातेवाईकांकडे त्या तरुणीस आपल्याकडे पाठवा, अशी मागणी केली.

पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नातेवाईकांकडे वीस लाख रुपयांची मागणीही केली. नातेवाईकांनी याला नकार दिल्याने यल्लाप्पा कोळी याने साथीदार महिलेकरवी मुलीच्या नातेवाईकांवर खोटे खटले दाखल करण्याची धमकी दिली.

याबाबत पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात यल्लाप्पा कोळी व त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी यल्लाप्पा व महिलेविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान अधिनियमाखाली तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Demand for Rs 20 lakh for making a pornographic video of a young woman viral