शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी ताकारी-टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

शेतकरीही पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

कडेगाव : किमान ५0 टक्के शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय ताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू करणार नाही, अशी आडमुठी भूमिका शासनाने घेतली आहे. शेतकरीही पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास विलंब होत आहे.वास्तविक ताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील शेतजमिनीची पाणीपट्टी आकारणी करताना संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाभक्षेत्र मोजणे आवश्यक आहे. परंतु पाणीपट्टी आकारणी पारदर्शक पध्दतीने होत नाही. अनेक बड्या शेतकऱ्यांचे लाभक्षेत्र दडविण्याचे प्रकार दोन्ही योजनांच्या पाणीपट्टी आकारणीत होतात. एकरी ६२५0 रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करून संबंधित कारखानदार योजनेकडे वर्ग करतात. एकाच शेतकऱ्याचा अनेक कारखान्यांना ऊस जातो. अशावेळी संबंधित योजनेच्या पाणीपट्टी आकारणी यादीप्रमाणे दोन्हीकडे कपात होते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो. ऊसपिकाशिवाय गहू, हरभरा, हळद, भाजीपाला अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल करण्याची सक्षम यंत्रणा योजनांकडे नाही. यामुळे सर्व भुर्दंड ऊस उत्पादकांनाच सोसावा लागतो. यामुळेच शेतकरी पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील ५0 टक्के पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सुरू करणार नाही, अशी आडमुठे भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे योजनांचे कार्यकारी अभियंता तसेच वरिष्ठ अधिकारी ५0 टक्के मागणी अर्ज प्राप्त होण्यापूर्वी आवर्तन देण्याचे धाडस करण्यास तयार नाहीत.यापूर्वी ५0 टक्के मागणी अर्ज प्राप्त होण्यापूर्वी आवर्तन सुरू केले जात होते. माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम ‘शेतीसाठी विनाविलंब पाणी सोडा, असे आदेश देत होते. पाणी मागणी अर्ज संबंधित गावांमध्ये उपलब्ध केले आहेत. परंतु अर्ज भरण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करीत आहेत. (वार्ताहर)कारखान्यांतर्फे वसुलीताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांची वसुली फक्त साखर कारखान्यांच्या माध्यमातून होत आहे. सिंचन योजना आणि साखर कारखाने परस्परावलंबी असल्याने एकमेकांना सहकार्य करतात. कारखाने वगळता पाणीपट्टी वसुलीची अन्य कोणतीही सक्षम यंत्रणा योजनांकडे नाही. ताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांसाठी जादा कर्मचारी नेमणूक करून पारदर्शक पाणीपट्टी आकारणी केली पाहिजे. याशिवाय योग्य दराने व सर्व पिकांची पाणीपट्टी वसुलीही केली पाहिजे.