मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 15:06 IST2021-12-01T15:00:10+5:302021-12-01T15:06:58+5:30

किरकोळ कारणावरुन वाद झाला असता ओळखीच्या दोघा तिघांनी एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला.

Death of a youth injured in a minor beating in Sangli | मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

संजयनगर : किरकोळ कारणावरुन वाद झाला असता ओळखीच्या दोघा तिघांनी एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला. फिरोज शेरअली शेख (वय-४०, सध्या रा. शिंदेमळा, सांगली. मुळ गाव -मिरज) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली शहरातील आहिल्यादेवी होळकर नेहरुनगर येथील मंगळवार बाजारच्या जवळ काल, मंगळवारी (दि.३० नोव्हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज शेख हा शिंदेमळा येथे त्याच्या सासुरवाडीत राहतो. त्याचे गुळगाव मिरज आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही तो दारूच्या नशेत होता. यावेळी त्याचा ओळखीच्या व्यक्तीशीस वाद झाला. यावेळी संबंधित दोघां तिघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला आज, बुधवारी पहाटे वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता तो मयत आढळून आला.

याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय श्रीरसागर यांनी दिली.

Web Title: Death of a youth injured in a minor beating in Sangli