शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील सरपंचाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: August 3, 2016 00:25 IST

लवंगातील घटना : मित्र बेशुद्ध; सांगली-कर्नाटक पोलिसांकडून संयुक्त तपास

सांगली/उमदी : कन्नूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील सरपंच सुधीर सोड्डी (वय ४५) यांचा लवंगा (ता. जत) येथे मंगळवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांचे मित्रही गंभीर जखमी असून, ते बेशुद्ध आहेत. या घटनेची माहिती मिळताच विजापूर तसेच सांगली पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा उलगडा करण्याचे काम सुरु होते. सोड्डी व त्यांचे मित्र दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ते दुचाकीवरून कन्नूरकडे निघाले होते, पण लवंगापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील गिरगाव रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला; तर एक मित्र गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी सोड्डी यांना मृत घोषित केले. मित्रावर उपचार सुरु ठेवले आहेत. सोड्डी यांच्या वाहनाला मोटारीने पाठीमागून धडक दिली आहे. यामध्ये ते व मित्र गाडीवरुन पडले. त्यानंतर पुन्हा मोटारीने त्यांना धडक दिली. यात सोड्डी यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांनीही, त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांचा खून केल्याचा आरोप केला आहे. सोड्डी यांचा मित्र शुद्धीवर आल्यानंतर या घटनेचा उलगडा होईल. पण त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले. सोड्डी यांचा राजकीय वादातून घातपात झाला आहे. पाळत ठेवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सोड्डी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात करण्यात आला. (प्रतिनिधी) जखमी पोलिसाचा भाऊ सोड्डी यांच्या मित्राचे नाव रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नव्हते. त्यामुळे नाव समजू शकले नाही. त्याचा भाऊ विजापूर पोलिस दलात हवालदार आहे. तो वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक आहे. त्यामुळे विजापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.