शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:56 IST

ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसानयंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली

अविनाश बाड आटपाडी : ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.आटपाडी तालुक्यात सध्या फक्त डाळिंब हेच नगदी पीक आहे. या भागातील वातावरणात दर्जेदार उत्पन्न देणारे डाळिंब यंदा मात्र तालुक्यावर रुसले आहे. २०१७ आणि २०१८ ही वर्षे दुष्काळाची गेली. २०१७ मध्ये तालुक्यात ४१५ मि. मी. पावसाची नोंद असली तरी, ५ महिन्यात ४० दिवसांच्या अंतराने पडलेल्या पावसाची नोंद आहे.

२०१७ मध्ये १ ते २ मि. मी. पासून १५ मि. मी. पर्यंतच्या कसलाही उपयोग न होणाऱ्या ३१ दिवसांच्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी फुगली. दि. ७ सप्टेंबर २०१७ रोजी तालुक्यात सरासरी ६८ मि. मी. एवढा एकच दिवस पाऊस पडला. त्यानंतर २०१८ मध्ये दि. १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यात सरासरी ५६ मि. मी. पाऊस एका दिवशी पडला.

बाकी विरळ पावसाचे ७ दिवस मिळून १८६ मि. मी. एवढा पाऊस पडला. पावसात एवढा मोठा खंड पडल्याने डाळिंबाची अवस्था वाईट झाली. त्यात उन्हाळ्यात मे महिन्यात ४० अंशापेक्षा जास्त तापमान १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिले. यंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.

शेतकऱ्यांनी जून महिन्यात डाळिंबाचा मृग बहर विकतचे पाणी टॅँकरने घालून धरला. पण आटपाडी तालुक्यातील डाळिंबाच्या इतिहासात यंदा प्रथमच फळधारणाच झाली नाही. तेल्या रोगाच्या आक्रमणापेक्षा हे वाईट आहे. बहर धरल्यावर कळी २२ व्या दिवशी झाडावर दिसते. तर ३५-३६ व्या दिवशी सेटींग (फलधारणा) होते.

सव्वा महिन्यात फलधारणा होणे अपेक्षित आहे. यंदा कळ्या लागतात; पण त्याला फळ लागण्याऐवजी फांदीवर हिरव्या काड्या म्हणजे फुटवा वाढत आहे. दरवर्षी खोडालाही फुटवा असतो. शेतकरी फळाचे अन्न फुटव्याला जाऊन झाड, फळे, अशक्त होऊ नयेत म्हणून काढतात. यंदा जूनपासून दर ११ व्या दिवशी फुटवा येतो. १५ व्या दिवशी शेतकरी काढतात. असे ७ ते ८ वेळा झाले आहे. नुसता खर्च वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली