दुचाकीच्या धडकेत जखमी सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
By शरद जाधव | Updated: January 1, 2024 20:15 IST2024-01-01T20:14:35+5:302024-01-01T20:15:14+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत शामराव पोतदार हे ३० डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता सायकलवरून बुधगाव येथून चालले होते.

दुचाकीच्या धडकेत जखमी सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून धडक दिल्यामुळे सायकलस्वार शामराव गोपाळ पोतदार (वय ६५, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ, बुधगाव) यांचा मृत्यू झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत शामराव पोतदार हे ३० डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता सायकलवरून बुधगाव येथून चालले होते. तेव्हा बुधगावातील बंद असलेल्या पेट्रोलपंपासमोर दुचाकी (एमएच ४५ एजी ७५९२) वरील चालकाने वेगाने येऊन पोतदार यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पोतदार गंभीर जखमी झाले होते. त्यांना मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मृत पोतदार यांचा मुलगा उदय शामराव पोतदार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.