शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 18:49 IST

रोज सात टीएमसी आवक

सांगली : कोयना, वारणा, राधानगरीसह कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचे हवामान विभागाकडून संकेत आहेत. त्यामुळे हिप्परगी, अलमट्टी धरणातील सध्याचा पाणीसाठा अत्यंत धोकादायक आहे. केंद्र जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तो पाणीसाठा चुकीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ जूनपर्यंत ५०८.६२ मीटर, ३० जूनपर्यंत ५१३.६० मीटर, १५ जुलैपर्यंत ५१७.११ मीटर व ३० जुलै रोजी ५१३.६० मीटर, तसेच ३० ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरच्या पुढे पाणी साठा करण्यास हरकत नाही. हाच नियम हिप्परगी बंधाऱ्याबाबतही आहे. हिप्परगी येथील बॅरेजची संपूर्ण दारे उघडी करून ३० ऑगस्टपर्यंत हिप्परगीची पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्यात यावी, असे ठरले होते. ठरल्यानुसार केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची अंमलबजावणी कर्नाटक जलसंपदा विभागाने केल्याचे दिसून येत नाही. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे जास्तीत जास्त पाणीसाठा करून ठेवायचे त्यांचे नेहमीचेच धोरण दिसत आहे. या पाणीसाठ्याचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे. सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कृष्णा खोऱ्यात पावसाचा जाेर वाढला आहे. हिप्परगी, अलमट्टी धरणात प्रमाणापेक्षा जास्त पाणीसाठा केल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला तातडीने धरणातून विसर्ग सुरू करून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाचे पालन करावे, अशी सूचना करावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचीही कर्नाटक सरकारकडून अंमलबजावणी होत नाही.

रोज सात टीएमसी आवकअलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१५.१६ मीटर आहे व तेथील पाण्याची आवक रोज सात टी.एम.सी. आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही आवक वाढण्याची शक्यता असून, दि. ३१ जुलैच्या आत अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९.६० मीटर होण्याची शक्यता आहे. अलमट्टीने विसर्ग वाढवला पाहिजे, अशी मागणीही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी