शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. ...

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. केळी बागा, डाळिंब बागा, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग, आदी पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कालव्याची खुदाई व अस्तरीकरण व्यवस्थित न करता ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडले होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये सोडलेल्या पाणी आणि आता पावसाळ्यात सोडलेले पाणी सनमडी, घोलेश्वर, मायथळ येथील पिकात घुसले आहे. उन्हाळ्यात अनेक शेतांची मशागत करता आली नाही, तर ज्या शेतात पेरणी झाली तेथे आता पिकांचे नुकसान होत आहे. आठ महिन्यांपासून शेतकरी या समस्येचा सामना करीत आहेत.

कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यात या पाण्याने नुकसान केले आहे. लवटे वस्ती येथे शेतकऱ्यांनी यापूर्वी काम बंद पडले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील, सुनील पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी देऊन काम सुरू करण्यास प्रयत्न केले होते.

या पाण्यामुळे दामाजी पवार, जोतिराम पवार, गुलाब पवार, श्यामजी पवार, शिवाजी पवार, जयवंत पवार, रामकृष्ण पवार, बाळू पवार, राजू बंडगर, श्रीशैल हुग्गु, गट्टू हुग्गे, बिरू हुग्गे, सुबराय काळे, मल्हारी काळे, संगांना पुजारी, बाळू नरुटे, बाळासाहेब कर्ले, आदींसह इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चौकट

पंचनामे करण्याची मागणी

प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना महिन्याभरपूर्वी लेखी निवेदन दिले होते. तरीही रविवारी रात्री अचानक कालव्याचे पाणी सोडल्याने पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. या सर्व पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कालव्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी दामाजी पवार यांनी केली आहे.

130921\1943-img-20210913-wa0041.jpg

कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील ४०० एकर जमीन पाण्याखाली