ग्राहकाकडून क्रेडिट कार्डची घेतली माहिती, अन् ९९ हजारांचा घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 19:10 IST2022-09-16T19:09:07+5:302022-09-16T19:10:03+5:30

तुमचे क्रेडिट कार्ड बंद करणार असल्याचे सांगत कार्डची सर्व माहिती घेतली

Credit card information was taken from the customer, and 99 thousand cheated in sangli | ग्राहकाकडून क्रेडिट कार्डची घेतली माहिती, अन् ९९ हजारांचा घातला गंडा

ग्राहकाकडून क्रेडिट कार्डची घेतली माहिती, अन् ९९ हजारांचा घातला गंडा

सांगली : शहरातील शिवोदयनगर परिसरात क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याचे सांगत ग्राहकाची माहिती घेत त्याला ९९ हजार ९८३ रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी प्रभुनाथ शिवदास प्रसाद (रा. शिवोदयनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ८ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. फिर्यादी प्रसाद हे कुटुंबीयांसह माधवनगर रोडवरील शिवोदयनगरमध्ये राहण्यास आहेत. प्रसाद यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला व त्याने तुमचे क्रेडिट कार्ड बंद करणार असल्याचे सांगत प्रसाद यांच्याकडून कार्डची सर्व माहिती घेतली.

यानंतर या कार्डवरून ९९ हजार ९८३ रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर वळती करून घेतली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Credit card information was taken from the customer, and 99 thousand cheated in sangli