शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

coronavirus: बिलांबरोबर उपचार प्रक्रियेचेही ऑडिट गरजेचे - जयंत पाटील    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 14:21 IST

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या पुढाकाराने पन्नास लाख रुपये खर्च करून ४० बेडचे अद्ययावत चोपडे मेमोरियल ट्रस्टकोविड रुग्णालय सुरू करण्यात आले.

सांगली  - कोविड रुग्णालयांमधील बिलाच्या ऑडिटबरोबर रुग्णांवरील उपचार प्रक्रियेचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या पुढाकाराने पन्नास लाख रुपये खर्च करून ४० बेडचे अद्ययावत चोपडे मेमोरियल ट्रस्टकोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण रविवारी जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, कोरोना रुग्णांवर उपचाराची भरमसाठ बिले येत असल्याने व त्याबद्दलच्या तक्रारी वाढत असल्याने अनेकठिकाणी वाद होत आहेत. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर लोक धावून जात आहेत. त्यामुळे बिलांच्या ऑडिटसाठी यंत्रणा उभी केली. बिलांप्रमाणेच आता कोरोना रुग्णांवर होणाºया उपचार प्रक्रियेचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालाय वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर असे चित्र असून चालणार नाही. रिमोटच्या सहाय्याने जर उपचार करायचे असतील तर त्या रुग्णालयांचा आणि त्याठिकाणच्या उपचाराचा काही उपयोग नाही.रुग्ण असलेल्या ठिकाणी दररोज सकाळ व सायंकाळी डॉक्टरांनी सुरक्षा साधनांसह भेट दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांमार्फत वरकरणी तपासण्या करून बाहेरूनच डॉक्टर औषधोपचार करणार असतील तर त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. अशी रुग्णालये उभारूनही काही उपयोग होणार नाही. सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत. कोरोनाचे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी का पडताहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहेत. काही डॉक्टर व कर्मचारी आवश्यक ते प्रयत्न करताहेत मात्र सर्वच ठिकाणी जर अपेक्षित उपचार प्रक्रिया राबविली तर मृत्यूदर कमी होऊ शकतो.आम्हा नेत्यांना कडेवर घ्यायची सवयजयंत पाटील म्हणाले, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी दहा फुटांवरून सर्वांशी संवाद साधतात. ते नियम पाळत असतात, मात्र आमच्याकडील सर्व नेत्यांना अशी सवय नाही. प्रत्येकाला कडेवर घ्यायची सवय त्यांना आहे. या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली