corona virus : ई-पासच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला बसणार चाप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:38 IST2020-08-24T18:37:15+5:302020-08-24T18:38:01+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्हांतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासच्या कटकटीतून जनतेची सुटका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे. यामुळे ई-पासच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटीलाही चाप बसणार आहे.

corona virus : ई-पासच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला बसणार चाप?
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्हांतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासच्या कटकटीतून जनतेची सुटका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे. यामुळे ई-पासच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटीलाही चाप बसणार आहे.
कोरोनामुळे प्रवासाला कोणी तयार होत नसताना, अत्यंत आवश्यक कारणासाठीच पासला अर्ज केला जात असे. तरीही महा ई सेवा केंद्र, सेतूसह इतर ठिकाणाहून तात्काळ पाससाठी ५०० ते हजार रुपये उकळण्यात येत होते. विशेष म्हणजे पास मिळण्याची मुदत तीन ते चार दिवसांची असताना, रक्कम पोहोच केली की काही तासात हा पास मिळत होता.
कोरोनामुळे अगोदरच जनता मेटाकुटीला आली असतानाई-पासच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीलाही जनता कंटाळली होती. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी वारंवार होत होती. प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने, अखेर शनिवारी केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांना पत्र पाठवून, ही अट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. आता यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.