corona in sangli : सांगलीत आणखी तीन जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:16 IST2020-05-12T19:16:06+5:302020-05-12T19:16:57+5:30
सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित झाले असून यामध्ये मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

corona in sangli : सांगलीत आणखी तीन जण कोरोनाबाधित
ठळक मुद्देसांगलीत आणखी तीन जण कोरोनाबाधितवैद्यकीय पथके रवाना
सांगली : सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित झाले असून यामध्ये मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अंकले, ता. जत येथील कोरोनाबाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोनाबाधित झाला आहे.
कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केल्या असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे.
या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.