corona in sangi-कोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:31 PM2020-04-13T13:31:34+5:302020-04-13T13:35:30+5:30

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर भय आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संकटकाळात लोकांना अनेक सावधगिरी बाळगण्याची सूचना करीत असतानाच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन जगभरातील नागरिकांना केले आहे.

corona in sangi - Free consultation service for Corona started | corona in sangi-कोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरु

corona in sangi-कोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरु

Next
ठळक मुद्देकोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरुजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली माहिती

सांगली : सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर भय आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संकटकाळात लोकांना अनेक सावधगिरी बाळगण्याची सूचना करीत असतानाच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन जगभरातील नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणू भय, चिंता आणि नैराश्याचे कारण बनत चालला आहे. विविध अभ्यास पाहणीतुन असे लक्षात आले आहे की, रुग्ण असो की मग क्वारंटाईन अथवा आयसोलेशनमध्ये असलेले व्यक्ती किंवा कोरोनाचा उपचार सुरु असलेली व्यक्ती असो त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मनोरुग्णावर देखील कोरोनाचा प्रभाव पडताना दिसतो आहे. कोवीड-19 या आजारासाठी प्रभावी उपचार उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये भिती व गैरसमज निर्माण होऊन मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी मोफत समुपदेशन सेवा ही अभिनव योजना सुरु केली असून ही सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण झाल्यास जिल्हा मानसिक आरोग्य कक्षातील मानसारेपचार तज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांना प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईल वर बोलून आपल्या मनातील भीती व त्यामुळे उदभवणारे मानसिक ताणतणाव यांना समर्थपणे तोंड देऊ शकता, त्याशिवाय सदर कक्षातील तज्ञांकडून लॉकडाऊन कालावधीत घरात असलेले, विस्थपित कामगार, बेघर, परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगार जे सध्या सांगली, मिरज व कुपवाड महानागरपालिका हद्दीतील निवारा गृहात आहेत, व्यसनाधिनतेमुळे निर्माण होणारे आजार, वसतिगृहातील अडकलेली मुले-मुली, वृध्दाश्रम, कारागृह, रिमांड होम, ऊस तोड कामगार, आरोग्य सेवा व पोलीस यंत्रणा यामधील सर्वासाठीही मोफत समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. 

मानसिक आरोग्य कक्षाकडे येणारी सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

जिल्हा मानसिक आरोग्य कक्षात कार्यरत सदस्यांचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. मानसपोचार तज्ञ डॉ. गजानन साकेकर मोबईल क्रमांक -9175577741, मानसपोचार तज्ञ डॉ. शितल शिंदे -  9922397582, मानसशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव सुर्यवंशी मोबईल क्रमांक -  9604965701, समुपदेशक अविनाश शिंदे मोबईल क्रमांक - 8007259119, मनोविकृती परिचारिका लॉरेन्स आवळे- 9834151603 असा आहे.

Web Title: corona in sangi - Free consultation service for Corona started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.