शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे आवकेवर परिणाम झाल्याने सरासरी २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद असल्याने किराणा मालासह फळांनाही अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडव्याला आंब्याला असणारी मागणी लक्षात घेता, आंब्याची आवक किंचित वाढली आहे.

सध्या शहरात वाहनांमधूनच भाज्यांची विक्री हाेत आहे, तर फळविक्रेते रस्त्यावर असले तरी, नागरिकच बाहेर नसल्याने विक्रीवर परिणाम झाल्याने फळेही वाहनांतून विक्री केली जात आहेत. तरीही अपेक्षित ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर आहेत. पण आवकेवर परिणाम झाल्याने पुढील काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

भाज्या महागल्या

आठवडा बाजार बंद, त्यात कडक निर्बंध यामुळे सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामस्वरूप दरही वाढले आहेत. वांगी, दोडका, गवारीचे दर ६० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत, तर पालेभाज्या १५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

चौकट

फळांना मागणी कमी

बाजार बंद असल्याने फळ विक्रेत्यांना ग्राहक कमी आहेत. या आठवड्यात कलिंगड, टरबुजाची आवक चांगली होती. मात्र, विक्रेत्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही वाहनातून फळविक्री करण्यात येत आहे.

चौकट

किराणाचे दर स्थिर

नवीन गहू, तांदळासह इतर शेतीमाल सध्या बाजारात येत असला तरी, निर्बंधामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. गव्हाचे दर काहीसे उतरले असले तरी, जुन्या गव्हाचे दर वाढलेलेच आहेत. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकानदार असले तरी, या आठवड्यात अपेक्षित व्यवसाय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोट

कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे सध्या व्यवसायावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर असून खाद्यतेलाची आवक मात्र, अपेक्षेपेक्षा कमी होत आहे.

- बापू सोनुरे, व्यापारी

कोट

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला मिळत नाही. तसेच इतर कारणांसाठीही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मिळत असलेले साहित्य जादा दराने मिळत आहे.

- पूजा जाधव, गृहिणी

कोट

या आठवड्यात आंब्याची आवक वाढत आहे. मात्र, विक्रीसाठी ठेवूनही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. आता गुढीपाडव्याला का होईना, ग्राहक मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- रामचंद्र बने, फळविक्रेते