शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांच्या बिलांसाठी महापालिकेत कर्जाचा घाट

By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST

पुन्हा वादाची चिन्हे : गुरुवारी प्रशासनासोबत होणार बैठक, १२५ कोटींच्या कर्जासाठी धडपड

सांगली : महापालिकेने मोठ्या दिमाखाने सुरू केलेल्या विविध शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी १२५ कोटी रुपयांच्या कर्जाचा घाट घातला जात आहे; पण योजना पूर्ण करण्याऐवजी ठेकेदारांची बिले अदा करण्यात महापालिकेला अधिक रस दिसून येतो. त्यात बँकेला तारणस्वरुपात दिल्या जाणाऱ्या जागांचाही वाद मिटलेला नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांची प्रशासनासोबत होणारी बैठक गाजण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने गेल्या सात वर्षांत विविध शासकीय योजना हाती घेतल्या आहेत. महाआघाडीच्या काळात पाणीपुरवठा व घरकुल योजनेचा प्रारंभ झाला. सध्या पाणीपुरवठा योजनेतून टाक्या, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही ५६ व ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) जलशुद्धीकरण केंद्राचे काम रडतखडत सुरू आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी ४० कोटींची गरज आहे. घरकुल योजनेत घरटी एक लाख रुपये याप्रमाणे केंद्राने निधी दिला. आता या घरकुलांची किंमत तीन ते चार लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेला दोन ते तीन लाख रुपये स्वनिधीतून घालावे लागणार आहेत. ड्रेनेज योजनेची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. सांगलीसाठी ७८ कोटी, तर मिरजेसाठी ५६ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला. त्यातही ५० टक्के वाटा महापालिकेचा आहे. शासनाने अल्पदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली होती. पण नंतर त्याकडे शासनाकडे पाठ फिरविली. एकट्या ड्रेनेज योजनेसाठीच महापालिकेला १०० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्यात सध्या पालिकेची अवस्था बिकट आहे. शासनाच्या अनुदानावर कशीबशी गुजराण सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी १२५ कोटी रुपये कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याला विरोधकांचा विरोध आहे. त्यासाठी गुरुवारी सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांची प्रशासनासोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विरोधकांना कर्जाची गरज पटवून दिली जाणार आहे. पण सध्या महापालिकेतील वातावरण पाहता ठेकेदारांची बिले काढण्याचे एकमेव काम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिकेने भविष्यात सव्वाशे कोटींचे कर्ज काढले तरी त्यातूनही हाच प्रकार होणार आहे. मूळ योजनेवर किती कोटी खर्च करणार, योजना पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना होणार? यावर खऱ्याअर्थाने चर्चा होण्याची गरज आहे. तसा कृती आराखडा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी दिला तर कर्ज उभारणीला विरोध होणार नाही, असे विरोधकांतून सांगितले जात आहे. पण पडद्याआड काही गोष्टी घडणार असतील तर, विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)जागा तारणचा वाद कायममहापालिका प्रशासनाने कर्जासंदर्भात काही बँकांशी संपर्क साधला. कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकेशी चर्चाही केली. कर्जापोटी महापालिकेला स्वमालकीच्या काही जागा बँकेला तारण द्याव्या लागणार आहेत. तशा चार जागा प्रशासनाने सुचविल्या; पण नंतर या जागा खासगी मालकीच्या असून, त्याबाबत न्यायालयात दावे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता प्रशासनाला नव्याने तारण द्यावे लागणार आहे.