Sangli: ठेकेदाराने ताकारी योजनेच्या पोटपाठवर असणारा आरसीसी पूल पाडला, शेतकरी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:38 IST2025-03-29T12:38:08+5:302025-03-29T12:38:48+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगांव) येथील ताकारी जलसिंचन विभागाच्या पोटपाठ क्रमांक ९ वर सिमेंट पाईपच्यावर असणारा आरसीसी पूल बंदिस्त ...

Sangli: ठेकेदाराने ताकारी योजनेच्या पोटपाठवर असणारा आरसीसी पूल पाडला, शेतकरी आक्रमक
वांगी : वांगी (ता. कडेगांव) येथील ताकारी जलसिंचन विभागाच्या पोटपाठ क्रमांक ९ वर सिमेंट पाईपच्यावर असणारा आरसीसी पूल बंदिस्त पाईपलाईन करणाऱ्या ठेकेदारांने पाडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाडलेला पूल तात्काळ न बांधल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
ताकारी जलसिंचन विभागाने ताकारी योजेनेचे सर्व पोटपाठ बंदिस्त पाईप लाईन करण्यात येत आहे. वांगी येथील पोटपाठ क्रमांक ९ वर बंदिस्त पाईप लाईनचे काम सुरू आहे. शिरगाव फाट्याजवळ सांगली - सातारा रस्त्याच्या पश्चिम बाजुला साईट पट्टीवर सिमेंट पाईपच्यावर आरसीसी बांधकाम केलेला पूल होता. या पुलावरून शेतकऱ्यांची ये जा आहे. तर या रस्त्याने ऊस वाहतूक केली जाते.
बंदिस्त पाईपलाईन करणाऱ्या या ठेकेदाराने हा पूल पाडला. हा पुल बांधला नाही तर शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी व ऊस वाहतुकीसाठी मोठी अडचण येणार आहे. तरी हा पूल तात्काळ बांधून मिळावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
कोणत्याही परवानगीशिवाय पूल पाडला
हा पूल पाडण्यासाठी संबंधित ठेकेदाराने ताकारी योजनेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून परवानगी घेतली नसल्याचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना फोनद्वारे सांगितले .