येलूर : पुणे-बेंगळुरु महामार्गावरील येलूर फाट्यावरील एका हॉटेल समोर कंटेनर उलटल्याने सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. काही युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. येलूर येथील एका हॉटेलसमोर आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर धडकून मागील बाजूची चाके निघून पडली. यामुळे कंटेनर उलटला. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम चालू असल्याने या ठिकाणी हॉटेल समोर वळण देऊन वाहतूक सेवा मार्गावरून होत आहे. इतकरे फाटा ते येलूर फाटा दरम्यान घसर असल्याने अवजड वाहनांना या वळणावरून वाहतूक करताना त्रास होत आहे. याच ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत आहेत. याकडे रस्ते विकास कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आजपासून दहावीचे पेपर सुरू झाल्याने या मार्गावरून निघालेल्या काही शिक्षकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
Web Summary : A container overturned near Yelur Phata on the Pune-Bengaluru highway, causing a three-hour traffic jam. No casualties were reported, but frequent accidents raise safety concerns. Road work and slippery conditions contribute to the problem, impacting commuters and teachers.
Web Summary : पुणे-बेंगलुरु राजमार्ग पर येलूर फाटा के पास एक कंटेनर पलट गया, जिससे तीन घंटे तक ट्रैफिक जाम रहा। कोई हताहत नहीं हुआ, लेकिन लगातार दुर्घटनाओं से सुरक्षा चिंताएं बढ़ गई हैं। सड़क का काम और फिसलन की स्थिति समस्या में योगदान करती है, जिससे यात्रियों और शिक्षकों पर असर पड़ता है।