शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देशात संविधान आणि मनुस्मृतीत संघर्ष -: बाबूराव गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:30 AM

देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही.

ठळक मुद्देसंग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.सांगलीत आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकावर संग्राम संस्थेच्यावतीने चर्चा

सांगली : देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सांगलीत ३० जूनला सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकांवर जिल्हाभरात चर्चा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) यांच्यावतीने मराठा समाज भवनात ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावर प्रा. डॉ. गुरव यांनी विचार मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. डी. लाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.

प्रा. डॉ. गुरव म्हणाले की, मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले होते. पुरुषप्रधान संस्कृती वाढविण्यास हीच संस्कृती कारणीभूत ठरली. समाजातील विशिष्ट वर्गच श्रेष्ठ व इतर शुद्र असा भेद निर्माण केला गेला. हा ग्रंथ बहुजन समाजाला टाचेखाली तुडविणारा आहे. त्यात अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथाशी मनूचा काहीच संबंध नाही. पाच हजार वर्षांपूर्वी मनूचा जन्म झाला होता. हा ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही त्रास सहन करावा लागला. पण त्या साऱ्याला शिवाजी महाराज पुरून उरले.

विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करणाºया या मनुस्मृतीविरोधात महात्मा फुले यांनी पहिल्यांदा आवाज उठविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून त्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशात मनुस्मृतीचे नव्हे, तर भीमस्मृतीचे राज्य येऊ शकले.

संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.समाजाची पिळवणूक करणारी ही संस्कृती असून, त्याविरोधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे मत टी. डी. लाड यांनी व्यक्त केले. सुलभा होवाळे यांनी आभार मानले. यावेळी संग्राम संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.चळवळ सुरू व्हावीदारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा याचा फायदा उठवित आजही मनुस्मृतीतील धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द संघटितरित्या चळवळ सुरू केली पाहिजे, असे डॉ. गुरव म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक