अभिनंदन पतसंस्थेला २८ लाख ५६ हजार ढोबळ नफा : सुहास रूगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:04+5:302021-04-11T04:25:04+5:30

आष्टा : आष्टा येथील अभिनंदन नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेला ...

Congratulations to Patsanstha, gross profit of 28 lakh 56 thousand: Suhas Ruge | अभिनंदन पतसंस्थेला २८ लाख ५६ हजार ढोबळ नफा : सुहास रूगे

अभिनंदन पतसंस्थेला २८ लाख ५६ हजार ढोबळ नफा : सुहास रूगे

आष्टा : आष्टा येथील अभिनंदन नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेला ढोबळ नफा २८ लाख ५६ हजार रुपये झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुहास रूगे यांनी दिली.

रूगे म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पतसंस्थेचा कारभार सुरू आहे. संस्थेचा स्वनिधी २ कोटी, ठेवी ९ कोटी ५३ लाख, कर्जे ७ कोटी ३८ लाख असुन गुंतवणूक ४ कोटी ६० लाख आहे. संस्थेला २८ लाख ५६ हजार रुपये नफा झाला आहे. संस्थेने १५ टक्के लाभांश दिला असून ऑडिट वर्ग सतत 'अ' आहे.

सचिव बबन रावळ म्हणाले, संस्थेने सभासद, ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहून काम केले आहे. समाजातील सर्व घटकांना आर्थिक उभारी देण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अध्यक्ष सुहास रूगे, उपाध्यक्ष सचिन आवटी, सर्व संचालक व महिला सल्लागार मंडळ यांच्या सहकार्याने संस्था प्रगतीपथावर आहे.

Web Title: Congratulations to Patsanstha, gross profit of 28 lakh 56 thousand: Suhas Ruge