मिरजेत अंगावरून ट्रक गेल्यामुळे महाविद्यालयीन विदयार्थ्याचा जागीच मृत्यू

By अविनाश कोळी | Published: October 14, 2023 10:13 PM2023-10-14T22:13:59+5:302023-10-14T22:14:15+5:30

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या अर्धवट कामामुळे बळी

College students died on the spot after a truck ran over them in Miraj | मिरजेत अंगावरून ट्रक गेल्यामुळे महाविद्यालयीन विदयार्थ्याचा जागीच मृत्यू

मिरजेत अंगावरून ट्रक गेल्यामुळे महाविद्यालयीन विदयार्थ्याचा जागीच मृत्यू

अविनाश कोळी, मिरज: मिरजेत पंढरपूर रोडवरील चर्च समोर ट्रक अंगावरून गेल्यामुळे सौम्य वल्लभ बिदरकर (वय १६) या महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे महाविद्यालयीन तरुणांचा सौम्य याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी दहा वाजता सौम्य सकाळी दहा वाजता दुचाकी वरून कॉलेज कडून मिरजेकडे येत होता. छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने या रस्त्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात त्याची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. यावेळी मागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघाता नंतर ट्रक चालक ट्रकसह पळून गेल्यामुळे नेमका अपघात कसा झाला यांचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. आहे मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत सध्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने वारंवार अपघात होत आहेत याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: College students died on the spot after a truck ran over them in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.