"सत श्री अकाल!" अमेरिकेच्या अभिनेत्याला दिलजीत दोसांजने शिकवली पंजाबी; धमाल व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:47 AM2024-06-18T11:47:59+5:302024-06-18T11:48:17+5:30

चमकीला फेम दिलजीत दोसांजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून तो एका परदेशी अभिनेत्याला पंजाबी शिकवताना दिसतोय (diljit dosanjh)

actor Diljit dosanjh teach punjabi to american actor jimmy fallon video viral | "सत श्री अकाल!" अमेरिकेच्या अभिनेत्याला दिलजीत दोसांजने शिकवली पंजाबी; धमाल व्हिडीओ व्हायरल

"सत श्री अकाल!" अमेरिकेच्या अभिनेत्याला दिलजीत दोसांजने शिकवली पंजाबी; धमाल व्हिडीओ व्हायरल

दिलजीत दोसांज हा सर्वांचा लाडका अभिनेता. दिलजीतला आपण आजवर विविध सिनेमांमधून सुंदर अभिनय करताना पाहिलंय. दिलजीतचा केवळ अभिनयच नाही तर गाणीही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. दिलजीतच्या लाईव्ह कॉन्सर्टला केवळ सामान्य माणसंच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावत असतात. अशातच दिलजीतचा एक धमाल व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिलजीतने एका अमेरिकन अभिनेत्याला पंजाबी शिकवलेली दिसतेय. 

दिलजीतने हॉलिवूड अभिनेत्याला शिकवलं पंजाबी

दिलजीत दोसांझचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ अमेरिकन अभिनेता जिमी फॉलनने शेअर केलाय. व्हिडीओत पाहायला मिळतं की, दिलजीत त्याच्या पंजाबी स्टाईलमध्ये 'पंजाबी आ गये ओये' म्हणतो. दिलजीतने म्हटलेली ओळ जिमी रिपीट करतो. जिमी अत्यंत क्यूटपणे स्वतःच्या शैलीत ही ओळ म्हणतो. दिलजीत सु्द्धा त्याच्या पंजाबी बोलण्याला चांगली दाद देतो. यानंतर दोघेही हसायला लागतात. शेवटी मग दिलजीत हात जोडून 'सत् श्री अकाल' म्हणतो. जिमी पुन्हा एकदा या ओळीची पुनरावृत्ती करतो. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून दिलजीतने अमेरिकन कलाकाराला पंजाबीचं वेड लावलंय असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

प्रियंका चोप्राने दिली खास प्रतिक्रिया

दिलजीत आणि जिमी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.  या व्हिडीओखाली इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्राने खास कमेंट केलीय. It’s the Oye for me अशी कमेंट प्रियंकाने केलीय. दिलजीत भारतात किंवा परदेशात कुठेही गेला तरीही तो आपली संस्कृती आणि परंपरा विसरत नाही. व्हायरल झालेला हा व्हिडीओ याचंच उदाहरण म्हणता येईल. दिलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्याची भूमिका असलेला 'अमर सिंह चमकिला' सिनेमा चांगलाच गाजला. याशिवाय तो 'CREW' या हिंदी सिनेमात विशेष भूमिकेत झळकला.

Web Title: actor Diljit dosanjh teach punjabi to american actor jimmy fallon video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.