शीतगृहांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:15+5:302021-02-20T05:19:15+5:30

लाड यांच्या उपस्थितीत क्रांती कोल्ड स्टोअरेजची द्राक्षे आखाती देशात रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, द्राक्ष ...

Cold storages raised the living standards of farmers | शीतगृहांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले

शीतगृहांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले

लाड यांच्या उपस्थितीत क्रांती कोल्ड स्टोअरेजची द्राक्षे आखाती देशात रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, अशोक पवार उपस्थित होते.

यावेळी अरुणअण्णा लाड म्हणाले, माफक दरात शेतकऱ्यांसाठी हे क्रांती कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिले आहे. याचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपला आर्थिक स्थर उंचवावा. यासाठी क्रांती उद्योग समूह नेहमी सहकार्य करेल.

यावर्षी ६४ टन द्राक्षे आखाती देशात पाठविण्यात आली आहेत. हा सर्व माल पलूस परिसरातील असल्याने येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास चालना मिळणार आहे.

यावेळी सागर आर्वे, अनिल लाड, क्रांतीचे उपाध्यक्ष उमेश जोशी, आत्माराम हारुगडे, एन. एस. पाटील, कुंडलिक थोरात, अशोक पवार, आर. के. सावंत, गुंडाभाऊ चौगुले, शीतल बिरणाळे, पोपट संकपाळ, संदीप पवार, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, महादेव लाड, सुशांत पाटील यांच्यासह क्रांती उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Cold storages raised the living standards of farmers