सांगली जिल्हा परिषदेत २५ हजारांची लाच घेताना लिपिकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:06 IST2021-05-20T16:05:46+5:302021-05-20T16:06:56+5:30

Sangli Zp CrimeNews Bribe : सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे (वय ५७, रा. उरुण, इस्लामपूर) हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.

Clerk caught taking bribe of Rs 25,000 in Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत २५ हजारांची लाच घेताना लिपिकाला पकडले

सांगली जिल्हा परिषदेत २५ हजारांची लाच घेताना लिपिकाला पकडले

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेत २५ हजारांची लाच घेताना लिपिकाला पकडलेकोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ

सांगली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे (वय ५७, रा. उरुण, इस्लामपूर) हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.

जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कामासाठी ठेवलेल्या अनामतीची मुदत संपल्याने तीदेखील मिळावी अशी विनंती केली होती.

या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी कुशिरेने ठेकेदाराकडे ३५ हजार रुपये मागितले होते, पैकी २५ हजार रुपये गुरुवारी घेऊन येण्यास सांगितले होते. ते स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कारवाईची माहिती काही वेळातच जिल्हा परिषदेत पसरली.

Web Title: Clerk caught taking bribe of Rs 25,000 in Sangli Zilla Parishad