सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकार्यात हाणामारी, समर्थक जमा झाल्याने वातावरण तणावपुर्ण
By शीतल पाटील | Updated: January 20, 2023 17:42 IST2023-01-20T17:31:44+5:302023-01-20T17:42:18+5:30
मारामारीची शहरात जोरदार चर्चा

सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकार्यात हाणामारी, समर्थक जमा झाल्याने वातावरण तणावपुर्ण
सांगली : शहरातील एका नाल्याच्या निविदेवरुन भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये महापालिकेच्या आवारात हाणामारी झाली. स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपचे सचिव अतुल माने यांच्यातील मारामारीने खळबळ उडाली.
पोलिसांनी धाव घेत माने यांना पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान घटनेचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी पालिका आवारात गर्दी केली होती. तर पोलिस ठाण्यासमोर माने समर्थक जमा झाले होते. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. भाजप नेत्यांनी मध्यस्थी करीत पोलिसांत तक्रार देण्यापासून दोघांना रोखले. या मारामारीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.