Chandoli dam area shook the earthquake shock | चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

ठळक मुद्देलोकांच्यात भीतीचे वातावरण होते. धक्के जाणवू लागल्यानंतर नागरिक घरातून बाहेर पडले.

वारणावती : चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू वारणावतीपासून १२ किलोमीटर अंतरावर होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने हा परिसर हादरून गेला आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर संवेदनक्षम आहे. पावसाळ्यात धुवाधार पाऊस असतो. वार्षिक साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. अशातच पावसाळ्यात भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कोंदटपणा निर्माण झाला होता. वातावरणातील बदलाचा परिणाम झाला की भूकंप होतात, असे सर्वसाधारण या भागातील लोकांचा अंदाज असतो.

गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण होते. धक्के जाणवू लागल्यानंतर नागरिक घरातून बाहेर पडले. अनेकांना या भूकंपाची जाणीव झाल्याचे सांगितले.


Web Title: Chandoli dam area shook the earthquake shock
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.