शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:01 IST

सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा वीजगृहातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद

वारणावती : चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात ३७४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील वारणावती पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण यावर्षी ही १०० टक्के भरले आहे.सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.९० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज १०० टक्के भरले असून, धरणात सध्या ९७४.१८८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात ०४ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणात ५५३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा वीजगृहातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून, वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा तसेच वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाईल.

शिराळा मंडल निहाय पाऊस

  • कोकरूड - ७.८ (१५९३.८०)
  • शिराळा - १०.३० (१२५७.६०)
  • शिरशी - २८ (१३०८.२०)
  • मांगले - २९.५० (१४४९.००)
  • सागाव- ३.३० (१४५३.९०)
  • चरण - ८.०० (२८७५.१०)

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये

  • पाथरपुंज येथे - १२ (७६५३)
  • निवळे - ३ (६२४१)
  • धनगरवाडा - ४ (३७६९)
  • चांदोली धरण - ४ (३७४१)

शिराळा, वाळवा व शाहुवाडी तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावर्षीही धरण शंभर टक्के भरल्यामुळे नागरिकांची शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे पाण्याचे काटकोरपणे नियोजन करून मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. - गोरख पाटील (शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे, वारणावती)

टॅग्स :SangliसांगलीDamधरणRainपाऊस