आष्टा ग्रामीण रुग्णालयास सिमेंट बाक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:24+5:302021-05-25T04:31:24+5:30

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालय येथे वैभव शिंदे युवा मंचच्यावतीने सिमेंटचे बाक भेट देण्यात आले. यावेळी आष्टा शहर ...

Cement back visit to Ashta Rural Hospital | आष्टा ग्रामीण रुग्णालयास सिमेंट बाक भेट

आष्टा ग्रामीण रुग्णालयास सिमेंट बाक भेट

Next

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालय येथे वैभव शिंदे युवा मंचच्यावतीने सिमेंटचे बाक भेट देण्यात आले.

यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. कोरोना लसीकरण तसेच कोविड सेंटर, नियमित रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. काही वेळेला रुग्णालयाच्या बाहेरील बाजूला बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. सिमेंटचे बाक मिळाल्याने नागरिकांची सोय झाली आहे.

मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, शैलेश सावंत, डॉ. प्रकाश आडमुठे, जितेंद्र पाटील, बजरंग सपकाळ, सादिक तांबोळी, अजित कांबळे, संकेत पाटील, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.

फोटो : आष्टा ग्रामीण रुग्णालयास सिमेंट भेट देताना वैभव शिंदे. सोबत डॉ. संतोष निगडी, डॉ. कैलास चव्‍हाण, शैलेश सावंत आदी.

Web Title: Cement back visit to Ashta Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.