Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक

Trent Boult Retirement News : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने निवृत्ती घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:07 PM2024-06-18T12:07:42+5:302024-06-18T12:09:33+5:30

whatsapp join usJoin us
Trent Boult Retirement News New Zealand captain Kane Williamson was emotional | Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक

Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Trent Boult Retirement : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने निवृत्ती घेतली आहे. त्याने या आधीच हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे सांगितले होते. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. बोल्टच्या निवृत्तीवर बोलताना किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन भावूक झाला. आपल्या शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात सोमवारी पापुआ न्यू गिनीविरूद्ध ट्रेन्ट बोल्टने १४ धावा देत दोन बळी घेतले आणि सामना जिंकून मग संघाचा निरोप घेतला. साखळी फेरीत अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागल्याने मोठा उलटफेर झाला. 

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पापुआ न्यू गिनीविरूद्धच्या सामन्यात बोल्टने त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला. ऑगस्ट २०२२ मध्ये बोल्टला न्यूझीलंडच्या वार्षिक करारातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याला संघात निवडण्याबाबच सातत्य दिसून आले नाही. बरेच वेळा तो संघाबाहेरही राहिला. त्यामुळेच तो विविध देशांमध्ये भरपूर ट्वेंटी-२० लीग स्पर्धा खेळताना दिसला आणि त्यात त्याने आपली छाप उमटवली. गेल्या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. 

विल्यमसन भावूक
आपला जवळचा सहकारी निवृत्त होत असल्याचे पाहून विल्यमसनने भावूक होत प्रतिक्रिया दिली. तो अखेरच्या सामन्यानंतर म्हणाला की, ट्रेन्ट बोल्टच्या निवृत्तीमुळे खूप दु:ख होत आहे. तो खूप चांगला सराव करतो. त्याने नेहमीच संघाला एक दिशा देण्याचे काम केले आहे. अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये त्याने न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे योगदान दिले.

ट्रेन्ट बोल्टने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत ७८ कसोटी सामन्यांमध्ये ३१७ बळी घेतले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या न्यूझीलंड गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात सोमवारी पापुआ न्यू गिनीविरूद्ध बोल्टने १४ धावा देत दोन बळी घेतले आणि सामना जिंकला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. 

Web Title: Trent Boult Retirement News New Zealand captain Kane Williamson was emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.