जतमध्ये सेंट्रिंग कामगाराचा खून, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:28 IST2019-02-20T20:27:07+5:302019-02-20T20:28:03+5:30
जत शहरात किरकोळ कारणावरून मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. अविनाश शिवाजी साळुंखे (वय ३०, रा. विठ्ठलनगर, तुरेवाले प्लॉट, जत) असे मृताचे नाव असून तो सेंट्रिंग कामगार होता.

जतमध्ये सेंट्रिंग कामगाराचा खून, तिघांना अटक
जत (जि. सांगली ): जत शहरात किरकोळ कारणावरून मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. अविनाश शिवाजी साळुंखे (वय ३०, रा. विठ्ठलनगर, तुरेवाले प्लॉट, जत) असे मृताचे नाव असून तो सेंट्रिंग कामगार होता.
ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्यादरम्यान विठ्ठलनगर परिसरात घडली. याप्रकरणी मृत अविनाश याची पत्नी कविता यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पृथ्वीराज शंकर निकम (१९), विकास ऊर्फ सोनू बाळासाहेब भोसले (२६) व आकाश ऊर्फ मोनू बाळासाहेब भोसले (२४, सर्व रा. विठ्ठलनगर, तुरेवाले प्लॉट, जत) या तिघांना अटक केली आहे.
सोमवार दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अविनाश साळुंखे हा गावातून घरी जात असताना, पृथ्वीराज निकम, विकास भोसले व आकाश भोसले या तिघांनी त्याला अडवून, तू एवढ्या रात्री इकडे कुठे फिरतोस?, असा जाब विचारून त्याला थांबवले. पण तो काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर या तिघांनी मिळून त्याला शिवीगाळ व दमदाटी करून लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण केली व त्याला तेथेच टाकून ते पसार झाले.