शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत वादळापूर्वीची शांतता, भाजप-शिवसेनेत उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 12:56 IST

पवार यांनी महाडिक बंधूंसोबत राजकीय खलबते?

अशोक पाटीलइस्लामपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूरकडे जात असताना भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे कासेगाव-पेठ येथे जंगी स्वागत केले. याचवेळी इस्लामपूर, शिराळा मतदारसंघातील जयंतरावांच्या राष्ट्रवादीत वादळापूर्वीची शांतता जाणवत होती. मात्र, भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण दिसून आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर येथे उत्तरदायित्व सभा रविवारी होती. परंतु, सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील जयंत पाटील यांच्या मूळ गावी कासेगाव येथे अजित पवार सायंकाळी ४ वाजता पोहोचले. यावेळी सांगलीचे अजित पवार गटाचे माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

जिल्ह्यातील राजकारणात ‘जिथे वनश्री तिथे विजयश्री’ असा राजकीय महाडिक पॅटर्नचा नारा पेठ नाक्यावर होता. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी हाच पॅटर्न भाजपमध्ये राबवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्रातील व राज्यातील नेते पेठनाक्यावर थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरकडे रवाना होताना व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत थांबून दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे हजर होते. पवार यांनी महाडिक बंधूंसोबत राजकीय खलबते केल्याचे समजते.एकंदरीत इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद असल्याचे मानले जाते. मुख्यत: जयंत पाटील यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार आपला गट प्रबळ करण्याच्या तयारीत आहेत. याला भाजप-शिवसेनेने साथ दिली आहे. सध्या तरी पुणे-बेंगलोर महामार्गावर बारामतीच्या पवार पॅटर्नचा ट्रेलर सुरू झाला आहे.

अजित पवार हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री अमित शाह यांची साथ आहे. आमचे नेते जयंत पाटीलच आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -विजय पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार